हिंगणा: इसासनी ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वाटप
Hingna, Nagpur | Oct 3, 2025 हिंगणा मतदार संघातील ईसासनी ग्रामपंचायत कार्यालय येथे 133 मंजूर दिव्यांग लाभार्थ्यांपैकी 75 दिव्यांग लाभार्थी यांना 5 हजार प्रति लाभार्थी असे धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्रिरत्न बौद्ध विहार ईसासनी बौद्ध विहार येथे आमदार समीर मेघे यांनी पोहचून तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पंचशील नगर येथे आयोजित सत्कार व आभार कार्यक्रमात उपस्थित झालो यावेळी प्रेमाने केलेल्या स्वागतबद्दल आयोजकांचे आभार मानले.