कोपरगाव: गौतमनगर येथे कर्मवीर कृषी महोत्सवात पूर्व हंगामी व सुरू ऊस व्यवस्थापन विषयावर चर्चासत्र संपन्न
गौतम पब्लिक स्कुल, गौतमनगर येथे सुरु असलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव 2025 च्या दुसऱ्या दिवशी आज ८ नोव्हेंबर रोजी डॉ. अंकुश चोरमुले (कार्यकारी संचालक, गन्ना मास्टर अॅग्रो इंडस्ट्रीज, सांगली) यांच्या 'पूर्व हंगामी व सुरु ऊस व्यवस्थापन' या विषयावरील चर्चासत्रात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी आ.आशुतोष काळे, व्हा. चेअरमन प्रविणजी शिंदे, संचालक शंकररावजी चव्हाण, श्रीरामजी राजेभोसले, वसंतरावजी आभाळे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजयजी आगवन उपस्थित होते.