अचानकपणे अतिरेकी हल्ला झाला तर कशा पद्धतीने परिस्थिती हाताळायची यावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्षिका
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
आज दिनांक 15 सप्टेंबर दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव पार पडला. जलद प्रतिसाद दल, कमांडो व बॉम्ब शोधक–नाशक पथकाने या सरावात भाग घेतला. अतिरेकी शोध, ओलीस सुटका आणि हल्लेखोरांना पकडण्याचा थरार दाखवण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सराव यशस्वीरीत्या पार पडला.