मांजरसुंबा येथे टँकरच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू ,नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मांजरसुंबा येथे कन्हैया हॉटेल जवळ पाण्याच्या जार प्लांटवर टँकर ने दिलेल्या जोराच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहेवजीर मक्तुम शेख हा कन्हेया अॅक्वा जारच्या प्लांटवर काम करत असताना यातील टेम्पो टँकर क्र. MH 04 CA 2774 चा चालक याने त्याच्या ताब्यातील टँकर हयगईने व निष्काळजीपणे पाठीमागे चालवित असताना पाठीमागे उमे असलेले फिर्यादीचे वडीलास पाठीमागुन धडक दिल्याने त्याचे डोक्यावरुन किन्नर साईडचे पाठीमागील टायर गेले.