लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नेहरू चौकाजवळ सोमवारी (१ डिसेंबर) सकाळी साडेदहा वाजता घरगुती सिलेंडरमधून झालेल्या गॅस गळतीचा भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत गंभीर भाजलेल्या करूणा मनोज जगताप (वय ४४, रा. जगताप हाइट्स, लोणी काळभोर) यांचा शनिवारी (६ डिसेंबर) रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.