राहुरी: ऑपरेशन मुस्कान:राहुरी पोलिसांची दमदार कामगिरी,९ वर्षांतील अपहृत १०० अल्पवयीन मुलींचा शोध, पो.नि. ठेंग्यांची माहिती
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत शंभराव्या अपहृत अल्पवयीन मुलीचा यशस्वी शोध घेण्यात आला आहे. गेल्या ९ वर्षांत अपहरण झालेल्या तब्बल १०० अल्पवयीन मुलींचा मागील दोन वर्षांत शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात राहुरी पोलिसांना मोठे यश आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आज मंगळवारी दिली आहे .