भंडारा: गोवा येथे कामासाठी जाणाऱ्या इसमाचा अपघाती मृत्यू ! किटाडी मार्गावरील घटना
सकाळच्या सुमारास गोवा येथे कामा निमित्य जात असल्याचे सांगून घरून निघून गेला होता. सायंकाळच्या सुमारास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी फोन करून ५० वर्षीय इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून ओळख पटविले असता संबंधिताचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास किटाडी मार्गावर उघडकीस आली. रूपचंद माणिकराव नरुले (५०) रा सोनेगाव पेंढरी असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे.