साकोली: लावारिस कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस साकोली सेंदूरवाफातर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्याना निवेदन
साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व या कुत्र्यांचे नियमित लसीकरण करावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस साकोली सेंदूरवाफाचे युवक अध्यक्ष प्रवीण भंडारकर यांच्या नेतृत्वात साकोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना हे निवेदन शुक्रवार दि 17 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते