धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा गावात कारण नसताना एकाला शिवीगाळ करत कुऱ्हाडीने वार करून कमरेवर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता घडली आहे. या संदर्भात शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.