राहुरी: छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांचा मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ शेटे यांचा आज गुरुवारी पहाटे मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेटे यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्याने राहुरी तालुक्यातील राजकारणात शेटे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.यावेळी प्रदेश प्रवक्ते संजीव भोर,जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले,तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, युवा सेना प्रमुख सचिन करपे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.