वैजापूर: भरधाव हायवाची दुचाकीला धडक अपघातात एकाचा मृत्यू,संतप्त जमावाने पेटविला हायवा, नांदूर ढोक येथील घटना
भरधाव हायवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील नांदूरढोक शिवारात घडली. जालिंदर एकनाथ गायधने वय 41 वर्षे राहणार नांदूरढोक असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे तर अपघातात योगेश भाऊसाहेब बाजारे राहणार नांदूर ढोक हे जखमी झाले आहे. घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जालिंदर व योगेश हे दोघे दुचाकीने शेतातून घरी जात असताना नांदूर ढोक शिवारात भरधाव हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.