रावेर: कासवा या गावाजवळ थंडीमुळे बेशुद्ध होऊन तरुणाचा मृत्यू,फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Dec 12, 2025 कासवा या गावाजवळ थंडीमुळे मिलिंद कुमार दिलीप भाई थोरात वय ३६ हा तरुण बेशुद्ध पडला होता. त्याला पोलीस पाटील कैलास बादशाह यांनी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णाला दाखल केले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. थंडीमुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे