शिरूर: शिक्रापूरमध्ये पुन्हा सुरू अवैध जुगाराचे धंदे; स्थानिक नागरिकांमध्ये संताप
Shirur, Pune | Sep 16, 2025 शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध जुगाराचे अड्डे पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीने हे प्रकरण समोर आणल्यानंतर जुगाराचे प्रकार थांबले होते. मात्र, काही स्थानिक माफियांच्या पाठबळामुळे हे धंदे पुन्हा उघडपणे सुरू झाल्याची माहिती मिळत आहे