जालना: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न; गाडी खड्यात आदळल्याने गाडीचे नुकसान
Jalna, Jalna | Sep 21, 2025 जालना येथील धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी जात असतांना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांच्या हस्तक्षेपाणे पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकरणी आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती रविवार दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय. अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे येत असताना समृध्दी महामार्गावरुन जालना रोडवर वळन घेताना घटना घडली.