पंढरपूर: जातीचा दाखला मिळाला नाही म्हणून महादेव कोळी समाजातील तरुणाची आत्महत्या : महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव
निलंगा तालुक्यातील शिवाजी वाल्मिक मेळळे (रा. दादगी) या तरुणाने आदिवासी महादेव कोळी जमाती चे दाखले देण्यास निलंगा प्रांत अधिकारी शरद झाडकेने टाळाटाळ केल्यामुळे तरुणाने आत्महत्या केलीय. या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. संपुर्ण आदिवासी महादेव कोळी जमात संतप्त झाली असुन महर्षी वाल्मिकी संघाचे अध्य गणेश अंकुशराव यांनी संबंधित प्रांताधिकारी यांची तातडीने बदली करावी, अशी आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता केली आहे.