नागपूर ग्रामीण: वाघाबाबत आक्षेपार्ह रील पोस्ट करणाऱ्या पश्चिम मुंबई येथील युवकाला नागपूर पोलीस दलातर्फे बजावण्यात आली नोटीस
30 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्राम फॉर एक व्यक्ती दारूची बाटली हातात घेऊन वाघाच्या डोक्यावरून हात फिरत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. हा व्हिडिओ खरा नसून कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार करण्यात आला होता. या वरील चा नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्प याच्याशी संबंध जोडण्यात आला होता. ज्यामुळे पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे आणि वन्यजीव प्रेमींमध्ये रोष निर्माण झाला आहे.