माढा: दारू पित असल्याचे सांगितल्याचा बळी; मजुराचा जागीच मृत्यू; शिवाजी महाराज चौकाजवळील घटना
Madha, Solapur | Sep 20, 2025 माढा तालुक्यातील शिवाजी महाराज चौकाजवळील अण्णाभाऊ साठे नगरकडे जाणाऱ्या बोळीत किरकोळ वादातून संतोष गंगाधर कदम वय ४५, रा.कसबापेठ माढा या मजुराचा मृत्यू झाला. १८ सप्टेंबर रोजी आरोपी अशानुअली शहाजान आली शेख रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. माढा यांनी संतोष कदम यांना "दारू पित असल्याचे का सांगतोस,तुला जिवंत ठेवत नाही"असे म्हणत शिवीगाळ केली व उजव्या हाताने कानामागे जोरात मारले. त्या मारामुळे संतोष कदम जागीच कोसळले व त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी कदम यांचे नातेवाईक अभिमान कदम यांनी फिर्याद दिली.