खेड: पुण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार! निवडणुकीपूर्वीच पवारांचे शिलेदार जाणार शिंदेंच्या शिवसेनेत
अतुल देशमुख यांच्यासोबत राजगुरुनगर, आळंदी, चाकण नगरपालिकांचे अनेक नगरसेवक, तसेच पंचायत समिती सदस्य आणि हजारो कार्यकर्ते धनुष्यबाण हाती घेणार आहेत. गुरुवारी चाकण येथे होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल, अशी माहिती मिळाली आहे.