जालना: मोची गल्लीतील नागरीकांची कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार; मटन शॉपवर कारवाई झालयाने परिसरातील नागरीकांना त्रास
Jalna, Jalna | Nov 3, 2025 जालना महानगरपालिकेच्या वतीने दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी मोची गल्ली येथील शक्ती बकरा आणि चिकन मटन शॉपवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दुकानदारकडून परिसरातील नागरीकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार महिलांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिली. सोमवार दि. 3 नाव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दुकानदार महिलांना पाहुन अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत असल्याचे महिलांचे म्हणनने आहे.महानगरपालिकेची कारवाईनंतर तक्रारदाराला दुकानधारक यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.