राहुरी तालुक्यात गेल्या नऊ वर्षात विविध प्रकरणात अपहरण झालेल्या सुमारे 100 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुरक्षिततेचा आधार देणारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.