अर्जुनी मोरगाव: इंजोरी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दर्शविली उपस्थिती
इंजोरी येथे धम्मशील महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित धम्मज्योत व ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमाला काशिनाथ कापसे उपसरपंच, रविंद्र खोटेले माजी सरपंच, मोरेश्वर मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, डाकराम मेंढे पोलीस पाटील, उदाराम शेंडे, राजु मेंढे, महादेव हुकरे, दिलीप हुकरे, अरुण मेंढे, छाया उके, पुजा मेश्राम, शुक्रवंदना शाहारे आदी मान्यवर उपस्थित होते.