नायगाव तालुक्यातील मौजे लोहगाव येथील होळकर चौकात दि 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 18:35 चे सुमारास यातील आरोपी सूर्यभान उर्फ सूर्या मुतणेपवाड हा स्वतःचे ताब्यात अवैधरित्या एक लोखंडी खंजर किमती दोनशे रुपयाचा बाळगलेला पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बेळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी दुपारी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनकांबळे हे आज करीत आहेत.