पंढरपूर: महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग आहे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाणार आहे त्यांनाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यालाच कर्जाच्या खाईत लोटणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. ते आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.