साकोली: मुंडीपारचा भेल प्रकल्प सुरू करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या 16 शेतकऱ्यांना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात व्हावे लागले हजर
साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्प सुरू करा यासाठी आंदोलन करणाऱ्या16शेतकऱ्यांना बुधवार दि 24 सप्टेंबरला सकाळी11 ते सायंकाळी 5 या वेळात भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर व्हावे लागले.भेल प्रकल्प सुरू करा अन्यथा आमच्या जमिनी परत करा असे आंदोलन या शेतकऱ्यांनी8 जून 2025 ला केले होते या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषद सदस्य आ.परिणय फुके यांनी केले होते या सोळा शेतकऱ्यांवर मात्र आता सर्व कामे सोडून कोर्टात हजर होण्याची वेळ आली आहे