शिरपूर: शिरपूर पंचायत समितीच्या 28 गटांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर,महिलांना 50 टक्के आरक्षण
Shirpur, Dhule | Oct 13, 2025 शिरपूर पंचायत समितीच्या 28 गटांसाठी 13 ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी डॉ.शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. त्यात शिरपूर पंचायत समितीच्या 28 गटांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी 1 गट,अनुसूचित जमातीसाठी 16 गट, इतर मागास प्रवर्गासाठी 7 गट,आणि सर्वसाधारण गटासाठी 4 गट निश्चित करण्यात आले.निश्चित आरक्षणपैकी 50% महिलासाठी राखीव ठेवण्यात आले.