शिरपूर: तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावरून 32 वर्षीय युवकाने घेतली उडी,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Sep 17, 2025 शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील राजेन्द्र सभांजी कोळी या 30 वर्षीय युवकाने 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारास रशिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावरून खाली नदीपात्रात उडी घेतली.दरम्यान 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सारंगखेडा पोलिस ठाणे हद्दीतील फेस शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला.यानंतर सारंगखेडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोहेकॉ प्रमोद ईशी करीत आहे.