उमरखेड: लोकसंचलीत साधन केंद्राची 15 वी वार्षिक आमसभा उमरखेड येथे संपन्न
महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत, लोकसंचालित साधन केंद्र उमरखेड येथे 15 व्या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कांताबाई इंगळे,उद्घाटक म्हणून उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे तर प्रमुख वक्ते म्हणून युवानेते इंजि.विद्वान केवटे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकसंचालित केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, आर एम ओ केशव पवार हे होते.