तरुणाई मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली आहे की रस्त्यावर दुचाकी चालवतानाही मोबाईल कानाला लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत वेग वाहतूक नियम आणि स्वतःसह दुसऱ्याचा जीव याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून मोबाईलवर बोलणे व्हिडिओ कॉल करणे किंवा मेसेज पाहणे ही धोकादायक सवय अपघातांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेत दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे चालू वर्षात दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 679 वाहन चालकांव