रईस लेन गल्ली धाराशिव येथुन बजाज एक्स सी डी मोटरसायकल लंपास धाराशिव शहर पोलीस ठाणेत गुन्हा नोंद
Dharashiv, Dharavshiv | Sep 2, 2024
धाराशिव शहर पोलीस ठाणेत फिर्यादी सुरेंद्रसिंग करणसिंग बगेल,रा.रईस लेन गल्ली धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची बजाज एक्स सी डी मोटरसायकल ही दि.31 ऑगस्ट रोजी सायं.9.30 ते दि. 1 सप्टेंबर रोजी स.6 वा. सु. रईस लेन गल्ली धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी सुरेंद्रसिंग बगेल यांनी दि.1 सप्टेंबर रोजी दु.1 वा दिलेल्या खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.अशी माहिती आज दि.2 सप्टेंबर रोजी दु.5 वा.पोलीस प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे