मौदा: अरोली शिवारात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Mauda, Nagpur | May 27, 2025 ग्रामीण भागात असलेल्या अरोली शेतशिवारात वीज पडून बाबदेव येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज चिंधु वंजारी वय 30 वर्षे राहणार बाबदेव असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.याबाबत वृत्त असे की अरोली शेतशिवारात नांगरटी सुरु असल्याने मृतक मनोज वंजारी हे शेतावर गेले होते. अशातच वादळ, पाउस व विजांचा गर्जना झाल्याने विज पडून मनोज वंजारी या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती तहसीलदार मौदा, पोलिस स्टेशन मौदा यांना देण्यात आली.