जालना: जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेचा समारोप;तायक्वांदोने जिल्ह्याच्या खेळ संस्कृतीला नवी दिशा दिली-विष्णू पाचफुले
Jalna, Jalna | Sep 19, 2025 क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व तायक्वांदो असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यात 65 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत दमदार सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख होते.