त्रिपुरारी पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त तळेगाव दाभाडे येथील श्री शिवशंभू तिर्थ येथे आज सायंकाळी भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले होते. परंपरेचा वारसा जपत श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा दीपोत्सव या वर्षी अधिक आकर्षक स्वरूपात साजरा झाला.