भंडारा तालुक्यातील खरबी येथील एका मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत रोख रकमेसह १५ मोबाईल संच असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी नोमेश भीमराव बावणकर (३४, रा. खरबी) यांचे आंबेडकर पुतळ्याजवळ मोबाईल रिपेअरिंगचे दुकान असून, दि. २७ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेपासून ते २८ डिसेंबरच्या पहाटे ५:३० वाजेदरम्यान अज्ञात आरोपीने दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील नोकिया, कार्बन आणि आयटेल कंपनीचे १५ मोबाईल...