बार्शीटाकळी: लग्नाआधी मतदानाचा संकल्प! बार्शीटाकळीतील नवरदेवाचा आदर्श निर्णय..!
अकोला जिल्ह्यात चार नगरपरिषद आणि एका नगरपालिकेसाठी एकूण ३३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीटाकळीतील नवरदेव "अंकुश ठक" याने आदर्श निर्णय घेतला आहे. लग्नसोहळ्यांची लगबग सुरू असताना अंकुशने ‘पहिले मतदान, मग लग्न’ अशी भूमिका घेत विदर्भात सकारात्मक संदेश दिला आहे. त्याने सकाळी लग्नाच्या तयारीपूर्वी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला आणि त्यानंतरच घोड्यावर बसण्याचा निर्धार पूर्ण केल.