आर्वी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वन्यजीव सप्ताह ..विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्त ग्रामशपथ
Arvi, Wardha | Oct 6, 2025 आदर्श ग्राम संसद ग्रामपंचायत मिर्झापूर नेरी येथील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव प्लास्टिक मुक्त करण्याची आज शपथ घेतली घरी आई बाबा किंवा अन्य कोणीही प्लास्टिक मध्ये भाजीपाला इतर साहित्य आणले तर त्याला मज्जाव करण्यात येईल आणि आईबाबांना प्लॅस्टिक वापरण्यापासून परावृत्त करण्यात येईल अशी शपथ घेतली आज दुपारी तीन वाजता सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी काढून येथील ग्राम सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..