समुद्रपुर:ज्या वृध्द शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे पण वयोमानाने त्याचे आधार कार्ड अपडेट होत नसल्याने त्यांची ईकेवायसी होत नसल्याने त्यांना अतिवृष्टीच्या आर्थिक मद्दीतीपासून वंचित राहावे लागत आहे.तरी शासनाने याकडे गार्भीयाने लक्ष देऊन यावर उपाययोजना करून त्याचे वारसानाचे नावे अतिवृष्टीची मदत जमा करावी अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार कपिल हाटकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.