यावल: यावल नगरपालिका निवडणुकी करिता सायंकाळी साडेपाच पर्यंत चालली प्रक्रिया,नगराध्यक्ष पदाकरिता एक,नगरसेवक करिता ५३ अर्ज दाखल
Yawal, Jalgaon | Nov 16, 2025 यावल येथील नगरपालिका निवडणूक की करिता रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारणे सुरू होते. तेव्हा येथे सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता एक तर नगरसेवक पदाकरिता ५३ अर्ज दाखल करण्यात आले. सोमवारी शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी गर्दी होणार आहे.