अमरावतीमध्ये भाजप–शिवसेना युती निश्चित; युवा स्वाभिमानही सोबत – मंत्री संजय राठोड अमरावती जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युती होणार असल्याचे संकेत मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. तसेच या युतीसोबत युवा स्वाभिमान संघटनाही सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महायुती अधिक मजबूत करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. अमरावतीत विकासाच्या मुद्द्यावर भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान एकत्र काम करतील,” असे संजय राठोड म्हणाले.