अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील भिलाटी भागात एका २२ वर्षीय तरुण महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिता अर्जुन भिल असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.