माननीय आरोग्य मंत्री श्री प्रकाशजी आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी मा. डॉ.रामजी आडकेकर यांची सिंधुदुर्ग आरोग्य विभागाला भेट
92 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 26, 2025 मा. आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी मा.डॉ.राम आडकेकर यांनी दि.25.11.2025 रोजी माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे भेट देवून आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी मा.डॉ.रामजी आडकेकर यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र खेबूडकर यांची भेट घेवून आरोग्य विभागाच्या योजना व आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविणेबाबात चर्चा केली.आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणेकरिता सभेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या छत्रपति शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आलेले होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.