राहुरी: ब्राह्मणी शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी शिवारात राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याच्या कडेला एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आज गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवल्यात असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.