कोरेगाव: सातारा जिल्ह्यात भाजपकडून सर्वत्र उमेदवारी; यशाबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विश्वास
सातारा जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले असून पक्षाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत मोठे यश मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेनंतर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता साताऱ्याकडे परतताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.