खुलताबाद: शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची चाचपणीला मोठी गर्दी
तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष निरीक्षक बाळासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार चाचपणी घेण्यात आली.शहरातील आमदार सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी घेण्यात आली. याबाबतची यादी तयार करण्यात येऊन ती चव्हाण यांना सादर करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.