जालना: जालना जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; नद्या-नाल्या तुडुंब तर अनेकांच्या घरात घुसले पाणी; रात्रभर सुरु होता मुसळधार पाऊस
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालना जिल्ह्या कालपासून सुरु असलेल्या पावसाने मध्यरात्री रौद्र रुप धारण केले. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसा हाहाकार केला असून 3 पाझर तलाव फुटले असून नद्या-नाले तुडुंब भरुन वाहु लागले आहे. शिवाय जालना शहरातील विविध भागात नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरीकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या हेल्पलाईनवर मंगळवार दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता संपर्क साधला मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कंट्रोल रुमने फोन घेतला नाही.