पो. स्टे.रामटेक अंतर्गत मनसर येथे रामटेक पोलीसचे एसआई हरिचंद्र मोरे यांच्या पथकाने कर्नाटक वरून निकृष्ट दर्जाची सुपारी घेऊन कानपूर कडे जात असलेला ट्रक क्र. एम एच 40 सिटी 5521 ला अडविला असता त्यात निकृष्ट सुपारी दिसल्याने पो. स्टे. रामटेक येथे आणण्यात आले.त्याला डिटेन करून पुढील कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासन नागपूर यांचेशी पत्रव्यवहार केला. त्या विभागाने रविवारला दुपारी ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नागपूरला नेल्याची माहिती रामटेक पोलिसानी सोमवारला दुपारी दिली.