अंबरनाथ: बदलापूर येथे मंत्री आशिष दामले आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची,व्हिडिओ आला समोर
बदलापूरच्या बेलवली येथील मतदान केंद्रावर भाजप नेते तथा मंत्री आशिष दामले आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. मतदान केंद्राबाहेर उभा राहण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर शंभर मीटर अंतरापर्यंत रेषा मारण्यासाठी मंत्री आशिष दामले यांनी सांगितले आणि त्यांच्यातील वाद मिटला. मात्र मतदान केंद्रावरून नागरिकांचा उत्साह असून सर्वांनी मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन आशिष दामले यांनी केले.