कन्नड: शेतात काम करताना विजेचा शॉक; चिंचखेडा बुद्रुक येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
कन्नड तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.ही घटना आज दि एक ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली.मृत तरुणाचे नाव योगेश अर्जुन काळे (२८) असे आहे.काळे कुटुंब गावालगत गट क्रमांक ३ मधील शेतात वास्तव्यास आहे.पाच वर्षांपूर्वी त्यांनी शेतातील घरासाठी वीजमीटर घेतले होते.अतिवृष्टीमुळे वायरवर कार्बन आल्याने घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.तो सुरळीत करण्यासाठी योगेश वायर हलवत असताना त्यांना जोराचा शॉक बसला.