नाशिक: शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज जयंती उत्साहात साजरी
Nashik, Nashik | Nov 2, 2025 शहरातील जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिर तसेच उपनगरातील विविध मंदिरांमध्ये शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. जुने नाशिक, पंचवटी,इतर भागांतील नामदेव विठ्ठल मंदिरांमध्ये समाजाच्या वतीने संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेची पूजा व महाआरती करण्यात आली. सकाळी सहा ते आठ या वेळेत काकड आरती, भजन, व अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. महिला भजनी मंडळांनी नामस्मरण व भक्तिगीते सादर केले.