घनसावंगी: "पुरग्रस्त बानेगावकरांसाठी आमदार हिकमत उढाण आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात तातडी संवाद"
घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बानेगाव येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी थेट मोबाईलवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधत ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या.आमदार उढाण यांनी सांगितले की, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी परिस्थितीवर लक्ष ठेवत आवश्यक ती मदत व उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार उढाण यांनी प