पवनी: अड्याळ पोलिसांनी मोह फुलाची अवैध दारूभट्टी केली उध्वस्त ! नवरगाव येथील इसमाविरोधात गुन्हा दाखल
Pauni, Bhandara | Sep 20, 2025 मोहफुलाची अवैधरित्या दारू काढण्यासाठी दारूभट्टी लावली असल्याच्या गोपनीय माहितीवरून अड्याळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोहफुलाची अवैध दारूभट्टी उध्वस्त केल्याची घटना घडली. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नवरगाव येथे घडली. या घटनेत अड्याळ पोलिसांनी नवरगाव येथील रमित उदाराम सेलोटे (२८) यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.